उणीव
कवी : अनिल
बदलले रंग आभाळाने
पांघरून धरतीला अंधारलेणे
विझला दिवस पळा पळा ने
कवेत घेऊन शुक्रतारा
अंधारल्या दशदिशा
विसावली वेल वृक्षा वरती
तेथ उमलली रातराणी
घालून साद केवड्याला
दिनरात्रीचा हा खेळ
लावतोय रोजच ताळमेळ
मापता मापे ना काळवेळ
पोरखेळ झाला जगण्याचा
उमलतो दिवस नव्या आशेने
फुलतो राजतरंगाने
संध्याकाळी विस्कटून जातो
एक तुझ्याच उणिवेने
यक्षरात्र
कवयत्री : अरुणा ढेरे
आयुष्य नावाचे खुळे गाणे
किनारा धरून रांगत चालला
दुःखांचा काफिला मस्तपणे
सुखाचेही तळ जातांना घासून
अस्तित्वाची खूण कळे मला
दिव्यापरी आता प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून श्वास दिला
आणि रंगगर्द क्षितीज पेटले
रात्री उजाडले क्षणमात्र
तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात यक्षरात्र
No comments:
Post a Comment